Pimpri News: 80 रूग्णवाहिकांच्या इंधनावर पंधरा लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना रूग्णांना विविध रूग्णालये आणि कोरोना केअर सेंटर येथे उपचारासाठी ने-आण करण्यासाठी पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) 80 रूग्णवाहिका तसेच आयुक्तांच्या आदेशानुसार 19 इनोव्हा मोटारी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच्या इंधनावर पंधरा लाखाचा खर्च झाला आहे.

रूग्णवाहिकांना रूग्णवाहिका व्यवस्थापन कक्षाकडून इंधन पुरवठा करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार, चिंचवड येथील गावडे पेट्रोलियम यांच्याकडून रूग्णवाहिकांना इंधन पुरवठा करण्यात येत आहे.

या रूग्णवाहिकांच्या इंधनापोटी 11 जुलै ते 29 सप्टेंबर या कालावधीत एकूण 14 लाख 70 हजार रूपयांच्या बिलांची पूर्तता करण्यात आली आहे. हा खर्च मध्यवर्ती भांडार विभागाकडील ‘कोरोना निधी’ या लेखाशिर्षातून देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना साथीचा प्रादूर्भाव झाल्यानंतर कोरोना रूग्णांना विविध रूग्णालये आणि कोरोना केअर सेंटर येथे उपचारासाठी तात्काळ पोहोचविणे आवश्यक होते. त्यासाठी रूग्णवाहिकांची आवश्यकता होती. त्यामुळे कोणताही करारनामा न करता थेट पद्धतीने रूद्राक्ष टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत 40 रूग्णवाहिका इंधन भाड्यासहित पुरविण्यात आल्या.

उपजिल्हाधिकारी तथा वाहन अधिग्रहन कक्षाचे समन्वयक अधिकारी यांच्यामार्फत 40 रूग्णवाहिका 24 तास उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत.

या रूग्णवाहिकांचे वाहन भाडे देण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दरपत्रक निश्चित केले. त्यानुसार, रूद्राक्ष ट्रॅव्हल्स यांना रूग्णवाहिका वापराच्या बीलांची पूर्तता करण्यात आली आहे.

21 मे ते 7 जुलै अखेर रूद्राक्ष ट्रॅव्हल्स यांना 40 रूग्णवाहिकांचे भाडे 45 लाख 57 हजार रूपये आणि डिझेल खर्च 2 लाख 33 हजार रूपये असे एकूण 47 लाख 91 हजार रूपये खर्च झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.