Pimpri News : जातीय तेढ निर्माण करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा- मराठा क्रांती मोर्चा

एमपीसीन्यूज : एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान मराठा आरक्षण मुद्दयावर मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर खालच्या पातळीवरील टीका करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यर्त्यांनी जोडे मारून निषेध नोंदवला. सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर खालच्या पातळीवरील टीका केल्यानंतर मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात ॲड. सदावर्ते यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने  निषेध करण्यात येत आहे.

बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्यासह दंगल भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ॲड. सदावर्ते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी धनाजी येळकर पाटील, जिवन बोराडे, सतिश काळे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते व ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा निषेध केला. त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली. यानंतर पोलीस आयुक्तांच्या नावे पिंपरी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

यावेळी सागर तापकीर, ज्ञानेश्वर लोभे, नकुल भोईर, गणेश सरकटे, सुभाष साळुंके, अभिषेक म्हसे, परशुराम रोडे, अमोल मानकर, विबीशन शिंदे, रावसाहेब बडे, राजु तेलंगी, सचिन भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.