Pimpri News: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन दिवसात पाच लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शुक्रवार (20 जानेेवारी) आणि शनिवार (दि. 21 जानेेवारी) या दोन दिवसात 887 (Pimpri News)कारवाया करून सुमारे पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. शहरातील 14 वाहतूक विभागांमध्ये राबविलेल्या या मोहिमेत दोन दिवसात 4 लाख 96 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी थेट खटले दाखल करून प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आली. तर विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या तसेच अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

Pimple Saudagar News : अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

हिंजवडी, देहूरोड, बावधन वाहतूक विभागात विरुद्ध दिशेने प्रवास केल्याबाबत एकही कारवाई करण्यात आली नाही. तर भोसरी आणि सांगवी वाहतूक विभागात सर्वाधिक कारवाई झाली. विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्यांवर सांगवी आणि वाकड विभागात सर्वाधिक कारवाई झाली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. तसेच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वादही होतात.

रॉंग साईड खटले – 106

नो एंट्री कारवाई – 781

नो एंट्री प्रकरणी दंड – 4 लाख 96 हजार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.