Pimpri news: कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये सरपण मोफत मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व स्मशानभूमीमध्ये कोरोना मृतांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी विनामूल्य सरपण देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना मृतांचा अंत्यविधी हा फक्त विद्युत दाहिनीमध्ये करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. परंतु, शहरात उपचारासाठी शहराबाहेरील व ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण येतात. दुर्दैवाने उपचारादरम्यान काहींचा मृत्यू होतो.

त्यामुळे शहरातील कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने दैनंदिन कार्यपद्धतींवर ताण वाढतो. त्याचा परिणाम म्हणून स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीसाठी नंबर लावण्याची परिस्थिती निर्माण होते.

अशी परिस्थिती शहरातील स्मशानभूमीमध्ये ओढवू नये, यासाठी कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी लागणारे सरपण विनामूल्य देण्यात येणार आहे.

फक्त कोविड काळात कोविड संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून सरपण खरेदीचा खर्च महापालिका उचलणार असल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86be105a5b6457bb',t:'MTcxMTY5NjQ3Ny4zNzkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();