Pimpri News: कोरोना नियमांचे पालन करत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त प्रबोधन पर्व

एमपीसी न्यूज – कोविड -19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करुन यावर्षी क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्व उत्साहात साजरे केले जाणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विचार प्रबोधन पर्वाची पूर्वनियोजन बैठक महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस सर्वपक्षीय गटनेते आणि शहरातील विविध पक्ष संघटनांचे निवडक प्रतिनिधी उपस्थित होते.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित होणार असल्याने महापालिका प्रशासनाने पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून सकारात्मक भूमिका ठेवावी अशी सूचना उपस्थितांनी मांडली.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी आणि दापोडी येथील पुतळा परिसरात रंगरंगोटी, स्थापत्य व विद्युत विषयक तसेच सुशोभिकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, जयंती कालावधीत अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पुतळा परिसर खुला ठेवण्यात यावा, विचार प्रबोधन पर्वामध्ये दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश असावा. पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करावी, माता रमाई आंबेडकर पुतळा लवकर बसवावा, कोरोना विषयक निर्बंध विचारात घेऊन शक्य झाल्यास मोकळ्या मैदानावर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करावे. अथवा महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांमध्ये ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम आयोजित करावे आदी सूचना बैठकीत करण्यात आल्या.

कोरोना नियमांचे पालन करुन लोकसहभागाने विचार प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम आयोजित करावे अशी सूचना विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी मांडली. माता रमाई आंबेडकर पुतळा बसविण्याच्या कामाला गती द्यावी अशी सूचना मनसे गटनेते सचिन चिखले यांनी मांडली.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन महत्वपूर्ण ठरते. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोरोना नियमांचे पालन करुन महापालिका चांगल्या पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.

चांगला समाज घडविण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचा जागर करुन हा वारसा पुढे नेला पाहिजे असे नमूद करुन आयुक्त पाटील म्हणाले, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्व साजरे करण्यासाठी कोरोना विषयक नियमांचा विचार करुन महापालिका नियोजन करणार आहे. शहरात होणा-या कार्यक्रमाबाबत महापालिकेचा सकारात्मक दृष्टीकोन असेल. यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून रुपरेषा आखली जाईल. बैठकीत आलेल्या सूचनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील.

प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाची गेलेली भीती घातक ठरु शकते. कोरोना संक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यामधून सर्वांचे संरक्षण करणे हाच उपाय आहे. शासनाचे नियम सर्वत्र लागू होतात. या नियमात राहून सर्वोत्तम विचार प्रबोधन पर्व आयोजन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे.

महापौर ढोरे म्हणाल्या, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देवून विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाईल. सध्या शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विकास कामे बाजूला ठेवून शहरवासीयांच्या आरोग्य हिताला प्राधान्य देण्याची महापालिकेची भूमिका आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करुन महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन केले जाईल.

या बैठकीस सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे, आयुक्त राजेश पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसदस्य रामचंद्र माने, अंकुश कानडी, मारुती भापकर, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरपीआय आठवले गटाचे नेते बाळासाहेब भागवत, सुधाकर वारभुवन, शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, युवक शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष सुरज गायकवाड, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे धनाजी नखाते, गोरख भालेकर, शुभांगी चव्हाण, एकता कर्मचारी संघटनेचे गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, शेखर गायकवाड, हनुमंत माळी, विशाल जाधव, धुराजी शिंदे, संतोष शिंदे, राजेंद्र पवार, अशोक जावळे, रामचंद्र आचलकर, प्रकाश बुख्तर, गोपाळ मोरे, कमलेश पिल्ले, विनोद गायकवाड, मिलींद घोगरे, विशाल कांबळे, विजय ओव्हाळ, सुर्यकांत ताम्हाणे, महेंद्र निशीगंध, अशोक निशीगंध, निलेश निकाळजे, दिनेश गलांडे, राजेश डोंगरे, शंकर लोंढे, अंजना कांबळे, रेखा ढेकळे, सुशील सोनकांबळे, प्रकाश धेंडे, दत्ता कांबळे, अंजना गायकवाड, भारत बनसोडे, चंद्रकांत सोनावणे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.