Pimpri News: माजी नगरसेवक रामदास बोकड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास गेनभाऊ बोकड (वय 60) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल (शुक्रवारी) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत पिंपळे गुरवमधून रामदास बोकड बिनविरोध निवडून आले होते. त्यांनी क्रीडा समितीचे सभापतीपद देखील भूषविले होते.  भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते अतिशय जवळचे कार्यकर्ते होते. सह्याद्री आदिवासी तरुण मंडळाचे बोकड काही काळ अध्यक्ष होते. आदिवासी समाजाचे कार्यकर्ते म्हणून रामदास बोकड यांची ओळख होती. समाजातील नागरिकांच्या अडी-अडचणीसाठी ते धावून जात असत. सामाजिक कार्यकर्ते ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास होता.

रामदास बोकड यांना शुक्रवारी त्रास होत होता. त्यांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. रात्री अकराच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्यांचे निधन झाले आहे. सांगवीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.