Pimpri News: माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्याकडून जिजामाता रुग्णालयाला 150 झाडांची रोपे, कुंड्या भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पिंपरी गावातील  जिजामाता रुग्णालयास भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने 150 विविध प्रकारची झाडांची रोपे तसेच कुंड्या भेट देण्यात आल्या आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजेच झाडे. झाडे आहेत म्हणून आज आपण पृथ्वीवर सुखरूप राहू शकतो. कारण झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेले प्राणवायू मिळतो. त्यामुळेच मानवी जीवनात झाडांना अन्यय साधारण महत्व आहे.

बदलत्या जीवनामुळे नागरिकांमध्ये झाडांविषयी महत्व कमी होत चालले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या मोठ्याप्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कडक उन्हाळा, प्रदूषण व जागतिक तापमानवाढ अशा समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे.याच भावनेतून पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये विविध झाडे भेट म्हणून देण्यात आली. जिजामाता रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुनीता साळवे, डॉ.अलवी नासेर व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.