Pimpri News : भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांची पालिकेला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार ख्यातनाम हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी आज (बुधवारी, दि.22) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. महापौर उषा ढोरे यांनी त्यांचे पुच्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक केशव घोळवे, प्रविण भालेकर, हॉकी संघटनेचे पदाधिकारी मनोज भोरे आदी उपस्थित होते.

जवळपास तीन दशके हॉकी खेळणारे पिल्ले यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी 1999-2000 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2000 साली त्यांना भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

2002 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेता ठरलेल्या हॉकी संघाचे ते कॅप्टन होते. जर्मनीत 2002 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांना देण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.