Pimpri News : शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकण, निगडी, हिंजवडी आणि वाकड परिसरातून या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

दुचाकी चोरीची पहिली घटना 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कडाची वाडी चाकण येथे घडली. याप्रकरणी बाळु संपत्ती शिंदे (वय 28, कडाचीवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिंदे यांची 30 हजार किंमतीची एमएच 14 एफबी 8944 ही गाडी हॅंडल लाॅक तोडून चोरुन नेली आहे.

दुचाकी चोरीची दुसरी घटना 22 सप्टेंबर रोजी निगडी येथील बजाज गेट समोर घडली. याप्रकरणी राजन प्रवीण सोनवणे (वय 26, लोहगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे यांची 50 हजार किंमतीची एमएच 12 पीबी 0449 ही निगडी येथील बजाज गेट समोर लाॅक करून ठेवली असताना अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.

दुचाकी चोरीची तिसरी घटना 1 ऑक्टोंबर रोजी भुमकर चौक वाकड येथे घडली. याप्रकरणी रोहित बाबुराव पाटील (वय 26, रा. भुमकर चौक, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पाटील यांची 50 हजार किंमतीची एमएच 10 सीई 7473 ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.

दुचाकी चोरीची चौथी घटना 25 सप्टेंबर रोजी काळेवाडी, वाकड येथे घडली. याप्रकरणी सिद्धार्थ बबन इंगवले (वय 29, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पाटील यांची 25 हजार किंमतीची एमएच 14 डिसी 6179 ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.