Pimpri News: महिला दिनानिमित्त 82 महिला अधिकारी, कर्मचा-यांच्या मोफत रक्त चाचण्या

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकिय विभाग आणि स्मार्ट सिटी विभागामार्फत पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे रक्त चाचण्या (CBC, Liver and Kidney Function Tests, Lipid Profile, Sr. Cholesterol, Thyroid Function Tests, Blood Sugar) मोफत करण्याच्या शिबिराचा शुभारंभ महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पार पडला.

नगरसेविका झामाबाई बारणे, आरती चोंधे, अनुराधा गोरखे उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेतील कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचे रक्त चाचण्या मोफत करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी उपायुक्त आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, सुषमा शिंदे, वैद्यकिय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, उप अभियंता संध्या वाघ, वैशाली ननावरे, अनघा पाठक, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, वैद्यकिय अधिकारी डॉ.कल्पना गडलिंकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चैताली इंगळे, वैशाली गायकवाड, सुनिता पळसकर, शिल्पा निफाडकर, पीएचएन शोभा ढोले इत्यादी महिला अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

या शिबिरामध्ये 82 महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या रक्त चाचण्या करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.