Pimpri News : हॉटेल अल्पाईनमध्ये दोन रात्री स्टे केल्यास मोफत कोरोना लस

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील हॉटेल अल्पाईनमध्ये, दोन रात्री स्टे केल्यास खासगी रूग्णालयात मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. हॉटेलमध्ये येणा-या यात्रेकरुंसाठी ही मोफत सुविधा हॉटेल मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबत ‘अल्पाईन’चे मालक दिनकेश तिलवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोना संसर्गावर लसीकरणाचे महत्व विषद झाले आहे. आम्ही हॉटेल अल्पाईनमध्ये येणा-या यात्रेकरूसाठी सरकारी नियमांनुसार खासगी लसीकरण केंद्रावर बुकिंग करून लस देण्याची सुविधा उपलब्ध केली. त्यासाठी येथे येणा-या यात्रेकरुंनी दोन रात्री याठिकाणी स्टे करणे अनिवार्य आहे. लस घेतल्यानंतर आराम करणं आवश्यक असते, तसेच काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेता यावा यासाठी दोन रात्री महत्वाच्या आहेत,’ असे तिलवाणी म्हणाले.

‘एकजणासाठी एक रात्र 1800 रूपये तसेच दोनजण असतील तर एका रात्रीसाठी 2400 रूपये भाडे आकारले जाईल. यामध्ये मोफत लस (कोविन अॅप्लिकेशनवर रितसर बुकिंग करून), नाश्ता, वायफाय आणि गरज भासल्यास वैद्यकिय सल्ला या सुविधांचा समावेश असेल,’ असे तिलवाणी म्हणाले.

यासाठी यात्रेकरुंनी किमान दोन रात्री हॉटेलमध्ये राहणे अनिवार्य असल्याचे तिलवाणी यांनी नमूद केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.