Pimpri News: शहरात शिवभोजन थाळी 14 मेपर्यंत मिळणार मोफत

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या वेळेत राज्य सरकारने बदल केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील 11 केंद्रांवर सकाळी 7 ते 11 या वेळेत 14 मेपर्यंत पार्सल स्वरूपात थाळी मोफत मिळेल.

सरकारने थाळींची संख्या 50 टक्क्यांनी वाढविली आहे. त्यानुसार, यापूर्वी 100 थाळी दिल्या जाणाऱ्या केंद्रावर 113 थाळी देण्यास सुरुवात झाली आहे. मोफत थाळी मिळत असल्याने मागणी वाढली असून, केंद्रावर गर्दी वाढू लागली आहे.

शहरात वायसीएम रुग्णालय, वल्लभनगर एसटी आगार, महापालिका इमारतीमधील केंद्र, जी ब्लॉक चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील केंद्र, पीएमआरडीए आकुर्डी रेल्वे स्टेशन, जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय (औंध), प्रतीक हॉटेल (देहूरोड), सुनेत्रा महिला बचतगट व्यापारी संकुल ( चिंचवड), श्रीपाद फूड सर्व्हिसेस (सांगवी), श्रीसंत तुकाराम महाराज संस्था (देहूगाव), स्वयंमहिला बहुउद्देशीय संस्था (भोसरी) या ठिकाणी शहरात मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.