Pimpri News: युवा सेनेकडून धर्मवीर चित्रपटाची मोफत तिकीटे

एमपीसी न्यूज – संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेला बहुचर्चित चित्रपट धर्मवीर मु.पो.ठाणे आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने पिंपरी युवासेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करत मोफत तिकीट वाटप करण्यात आले.

ढोल ताशाच्या गजरात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेसह चित्रपटगृहात प्रवेश करण्यात आला. चित्रपटगृहाच्या आवारात स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यावेळी सर्वांना भगवे फेटे परिधान करून चित्रपटगृहात प्रवेश देण्यात आला. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा एकनिष्ठ शिवसैनिक अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 20% राजकारण 80% समाजकारण समीकरण सत्यात उतरवणारे निष्ठावंत  व हिंदु – मुस्लिम कोणताही भेदभाव न करता सोबत घेऊन आपापसात जातीय सलोखा कायम रहावे. यासाठी सतत प्रयत्न करणार्या खऱ्या शिवसैनिकाची हि कथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या दिग्दर्शक व चित्रपट निर्माते व कलाकार प्रसाद ओक व सहकलाकार यांचे मनापासून अभिनंदन करून सर्वांनी हा चित्रपट आपल्या परिवारासह आवर्जून पहावा, असे अवाहन पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके यांच्या वतीने करण्यात आले.

त्या प्रसंगी विभाग प्रमुख गोरख नवघणे, माजी नगरसेवक राजू बनसोडे, शाखा प्रमुख स्वप्निल शेवाळे, युवा अधिकारी अथर्व शिंदे, अविनाश जाधव, मनोज का ची, चिंचा पा निन्गडॊळे, सुहास गायकवाड, अनेक युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.