Pimpri News : नव्या कामगार कायद्यात शोषणाचे मुक्त अधिकार – माकप

एमपीसी न्यूज – ऐतिहासिक म्हणून वर्णन केलेल्या नवीन कामगार कायद्यामुळे कामगारांच्या हक्कांचा तोटा होणार आहे. पिंपरी चिंचवड, पुणे औद्योगिक क्षेत्रातील लक्षावधी कामगार नव्या पिळवणूकीचे बळी होतील अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नवीन कामगार कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गणेश दराडे, सतीश नायर, अपर्णा दराडे, क्रांतीकुमार कडुलकर, बाळासाहेब घस्ते, सुकुमार पोन्नपन, किसन शेवते, शेहनाज शेख यांच्या वतीने नवीन कामगार कायद्याचा निषेध नोंदवला आहे.

नवीन कायद्यानुसार, कंपनी कामगारांना नफ्यासाठी कामावर ठेवेल त्यामुळे, कामगारांच्या हक्कांचा तोटा होणार आहे. 300 कामगार असलेल्या आस्थापनात कामगारांना कोणतेही संविधानिक अधिकार राहणार नाहीत. कामगारांचे किमान वेतन, महागाई भत्ता, बोनस, आरोग्य विमा या सर्व हक्कांना तिलांजली देण्यात आली असून लक्षावधी कामगार नव्या पिळवणूकीला बळी पडणार आहेत.

भारतीय संविधानातील मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे हे कायदे आहेत, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आदर्श संहितेचा मोदी सरकारने भंग केला असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.