Pimpri News : ‘पंतप्रधान आवास’मधून आता सामाईक जागेवरही बांधकाम

एमपीसी न्यूज – जागेची समस्या शहरी भागात मोठ्या (Pimpri News) प्रमाणात जाणवत असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जागा सामाईक असल्यास अशा पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ घेणे शक्य व्हावे, यासाठी त्यांना सामाईक जागेवर बहुमजली इमारत बांधण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

एकाच कुटुंबातील परंतु सामाईक जागा असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात बहुमजली इमारत बांधण्यास शासनाने परवानगी दिली आहे, याबाबतचे आदेश गृहनिर्माण विभागाचे कार्यासन अधिकारी राजू अंबाडेकर यांनी काढले आहेत. 2019 मध्ये शासनाने सुधारणा केली असून त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत पात्र कुटुंबातील सज्ञान कमावती व्यक्ती ही या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आली आहे.

 

MPC News Podcast 8 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

अशा परिस्थितीत एकत्र कुटुंब पध्दतीमुळे कुटुंबप्रमुखांच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने कुटुंबातील इतर पात्र लाभार्थ्यांना नावावर जागा नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता (Pimpri News) येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. योजनेत लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.