Pimpri News: गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन; जमीनमालकाला मिळणार 100 कोटींचा मोबदला

एमपीसी न्यूज – पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार असून त्यासाठी जागा मालकास जागा ताब्यात घेण्यासाठी मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 100 कोटी खर्च अपेक्षित आहे.

खासगी मालकीच्या आणि महापालिका मालकीच्या जागेवर गांधीनगर वसले आहे. 62 हजार 714 चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेल्या या झोपडपट्टीच्या जागेवर खेळाचे मैदान, दवाखाना, माध्यमिक शाळा, किरकोळ बाजार, उद्यान, डिपी रस्ता आदींचे आरक्षण आहे.

_MPC_DIR_MPU_II

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जाणार असल्याने भूखंड ताब्यात घेण्याकामी जागा मालकास 100 कोटी रुपये मोबदला द्यावा लागणार असल्याचे सल्लागाराने म्हटले आहे.

याखेरिज 26 लाख 15 हजार 750 चौरस फुट ’स्लम टीडीआर’ तयार होणार असून त्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.