Pimpri News : वीजबिल भरण्यासाठी सवलत मिळावी – मनसे चित्रपट कर्मचारी सेनेची मागणी

0

एमपीसी न्यूज – वीजबिल न भरणा-या ग्राहकांचे कनेक्शन बंद करण्याची कारवाई महावितरणकडून सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना वीजबिल भरण्यास चार टप्प्यात सवलत द्यावी तसेच सध्या सुरु असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने महावितरणच्या काळेवाडी शाखेच्या सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष दत्ता घुले, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, रोहित थोरात, चांगदेव हिंगे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

वीजबिल न भरणा-या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई केली जात आहे. ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची देखील कारवाई करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर अद्याप आलेले नाहीत.

अनेकजण हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना वीजबिल चार टप्प्यात भरण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment