Pimpri News : राजकीय सोयीसाठी घरकुलची घोषणा नको, सर्व बेघरांना घरकुल मिळावे – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – निवडणूक जवळ आली की घरकुल ची घोषणा केली जाते आणि निवडणूका संपल्या की घरकुल योजना बळगळते जाते. राजकिय फायद्यासाठी घरकुलची घोषणा नको. कागद काचपत्रा वेचक, धुणी भांडी, स्वयंपाक, साफसफाईचे कामे करणाऱ्या महिला, फेरीवाले, बांधकाम मजुर आशा कष्टकरी व बेघर जनतेला घरकुल मिळाले पाहिजे असे मत कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थीना घरकुल वाटपाची सोडत काढण्याचा कार्यक्रम होत आहे. रावेत आणि बोराडे वाडी येथील 3 हजार 647 व्यक्तींना लकी ड्रॉ द्वारे घरकुलचे वाटप केले जाणार आहे. या योजनेत 47 हजार 801 नागरिकांनी फॉर्म भरले असून फॉर्मसोबत प्रत्येक व्यक्तीकडून पाच हजार रुपये घेण्यात आले आहेत.

बाबा कांबळे म्हणाले, घरकुल प्रकल्प पूर्ण नसताना, सोडत काढण्याची घाई का? केली जात आहे याचे कारण येणाऱ्या महापालिका निवडणुका आहेत. यापूर्वी देखील जे एनएनयुआरएम योजने अंतर्गत शहरात 13 हजार 250 घरकुलची घोषणा करण्यात आली. त्यापैकी फक्त 6 हजार 720 लाभार्थींना घरकुल मिळाले उरळीत व्यक्तींना मात्र अजूनही घरकुल मिळाले नाही.

घरकुल हा सर्वसामान्य बेघरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात राजकीय भांडवल आणि मत मिळण्याचे साधन म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. या प्रश्नांवर घरकुल धारकांन मध्ये मोठा असंतोष निर्माण होत असून घोषणा करून फॉर्म भरून घरकुल दिले जात नाही हि भावना बळ धरत आहे. घरकुलच्या प्रश्नांवर शहरात तीव्र आंदोलन होईल आशा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.