Pimpri news: गिरिजा चिद्दरवार यांना पी.एचडी. प्रदान

एमपीसी न्यूज – सिंहगड महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या सहायक अध्यापक गिरिजा गिरीश चिद्दरवार यांना नुकतीच ‘ शेप बेस् इमेज रिट्रियल’या विषयावर पी. एचडी. प्रदान करण्यात आली. कोणत्याही सर्च इंजिनवर फोटोद्वारे शोधली जाणारी माहिती अचूकरित्या मिळवण्यासाठी गिरीजा यांनी केलेले काम उपयोगी ठरणार आहे.

हैदराबाद येथील गीतम् युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चिद्दरवार यांनी ही पी. एचडी. मिळवली आहे. गेल्या 21 वर्षापासून त्या अध्ययन क्षेत्रात कार्यरत आहेत. गीतम् युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख प्रो. डॉ.एस.पणिकुमार यांचे चिद्दरवार यांना मार्गदर्शन लाभले.

एखाद्या इमेजवरून माहिती मिळवताना बऱ्याचदा तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे बहुतांश कामे रखडतात याचा विचार करून आणि काळाची गरज ओळखून सर्च इंजिनद्वारे मिळवल्या जाणाऱ्या माहितीतून अचूक डाटा मिळण्यासाठी ‘शेप बेस् इमेज रिट्रियल’ हा प्रोजेक्ट महत्त्वाचे काम करणारा आहे.  गेल्या सात वर्षांपासून चिद्दरवार यांनी याबाबत संशोधन करून पी. एचडी.  मिळवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.