Pimpri News : महापालिकेतर्फे गिरीश प्रभुणे, डॉ. यशवंत इंगळे, शिवकुमार लिंबाळे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पद्मश्री गिरीश प्रभुणे, दंतशल्यचिकित्सक डॉ. यशवंत इंगळे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिवकुमार लिंबाळे यांचा महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह शाल आणि पुस्तक देऊन महासभेत सन्मान करण्यात आला.

उपमहापौर हिराबाई घुले,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,आयुक्त राजेश पाटील, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले,अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,नगरसचिव उल्हास जगताप आणि नगरसदस्य, नगरसदस्या तसेच अधिकारी उपस्थित होते.

सत्कारमूर्तींनी आपल्या दैदिप्यमान कौशल्याने, अमूल्य अशा योगदानाने पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक वाढला असून त्याचा शहराला सार्थ अभिमान वाटत आहे असे सांगत महापौर ढोरे यांनी म्हणाल्या, शहरात अनेक नामवंत कलावंत, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू,सामाजिक कार्यकर्ते, गुणवंत कामगार,विद्यार्थी यांचे वास्तव्य आहे.

आज सत्कार करण्यात आलेल्या महान विभूतींनी पिंपरी- चिंचवड नगरीमध्ये मानाचा उच्च पुरस्कार मिळवून शहराच्या नावलौकिकात भर पाडली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांचा सन्मान करता आला याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाकरीता दिले. शिक्षणाचा प्रसार व प्रचार केला. त्यामुळे त्यांचा कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. यशवंत इंगळे हे जुलै 1992 पासून महापालिकेमध्ये दंतशल्यचिकित्सक या पदावर रुजू झाले आहेत. त्यांना दंत शास्त्रातील ऑस्कर समजले जाणारे आउट स्टँडिंग डेंटिस्ट हा देशपातळीवरील सन्मान प्राप्त झाला आहे.

तसेच शिवकुमार लिंबाळे यांनी अनेक पुस्तके, कांदब-या, कथा आणि इतर साहित्य लिहिले आहे. लेखणीतून प्रतिभासंपन्न साहित्याची निर्मिती केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.