Pimpri News : शास्तीकर सरसकट माफीच्या निर्णयाचा प्रामाणिकपणे कर भरलेल्या मिळकत धारकांनाही लाभ द्या- महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकराच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या शास्तीकर सरसकट माफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजाणवी करावी. तसेच, प्रामाणिकपणे शास्तीकर (Pimpri News) भरलेल्या मिळकतधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी  भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर लादलेला शास्तीकर सरसकट पूर्ण माफ करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात (डिसेंबर- 2022) केली होती. त्यानंतर 3 मार्च 2023 रोजी राज्य सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने अधिकृत ‘जीआर’ प्रसिद्ध केला आहे.

 

Alandi News :आळंदीमध्ये लहान मुलांनी घेतला धुळवडीचा आनंद

 

4 जानेवारी 2008 रोजी तत्कालीन राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडकरांवर शास्तीकर लादला होता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी या निर्णयाविरोधात वेळोवेळी (Pimpri News) आवाज उठवला आहे. आता 14 वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकराच्या बोजातून सुटका झाली आहे. त्यामुळे शास्तीकर माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित विभागाला तात्काळ लिखीत आदेश द्यावेत, असेही

समायोजन अन्‌ जनजागृती करा

ज्या मिळकतधारकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरला आहे. त्यांना या शास्तीकर माफीचा लाभ आपण देणे गरजेचे आहे. पूर्वी भरलेल्या शास्तीचे समायोजन करण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील तळागाळातील मिळकतधारकांना शास्तीकर माफीच्या निर्णयाचा फायदा होणे आवश्यक आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शास्तीकर माफीच्या निर्णयाबाबत समज व गैरसमज याबाबत प्रशासनाने लोकासमोर जागृती करावी. महापालिका प्रशासनाने सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून शास्तीकर माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.