Pimpri News : दुधाच्या मोकळ्या पिशव्या द्या, झाडाचे रोप घ्या ! हिरवळ वाढविण्यासाठी ‘झिरो प्लॅस्ट’ उपक्रम

एमपीसी न्यूज – शहरात हिरवळ वाढविण्यासाठी तसेच औषधी गुणधर्मांची झाडे घरोघरी पोहोचविण्यासाठी इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने ‘झिरो प्लॅस्ट’ हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना दुधाच्या मोकळ्या पिशव्या देऊन आवडीचे झाड घेता येणार आहे.

दुचाच्या मोकळ्या पिशव्या धुवून, सुकवून द्याव्या लागणार आहेत. पिशव्यांच्या बदल्यात आवडीच्या झाडाची रोपे घेता येतील. प्रत्येक रिकाम्या पिशवीचा दर 40 पैसे प्रती पिशवी आहे. पिशव्या दिल्यानंतर नागरिकांना त्यांच्या आवडीच्या झाडाचे रोप घेता येईल. रोपाच्या किमतीतून पिशवीचे पैसे वजा करून उर्वरित पैसे मात्र नागरिकांना द्यावे लागणार आहेत. यामध्ये फुले, सुगंधी, आयुर्वेद प्रकारातील झाडे खरेदी करता येतील.

ही संकल्पना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी राबवली जात आहे. खालील रोपे विकत घेता येतील –
आंबेमोहोर, बासमती, गोकर्ण पांढरा-निळा, कोरफड, मेहंदी, निलगिरी (सुगंधी), पाषाण भेद, कापूर तुळस, पानफुटी, कृष्णकमळ (निळा-लाल), जास्वंद, तगर, बांबू, अडुळसा, गुडमार, लेमन बाम, मिंट, पान ओवा, सब्जा, लवंग तुळस, सिट्रॅनीला, चिनी गुलाब, निशिगंध, शेवंती, एक दांडी लसूण, अक्कलकरा, इन्सुलिन, गवती चहा, मिरी, पान, मधुपर्णिका, वेखंड, करवंद, काश्मिरी गुलाब, देशी गुलाब, अनंत, मोगरा, रातराणी, बोगनवेल, ऑल स्पायसेस, कढीपत्ता, लेंडी पिवळी, मल्टि व्हिटॅमिन, पान, कृष्ण तुळस, वाळा, पुदिना

खालील ठिकाणी मिळतील रोपे –
3 डिसेंबर (गुरुवार) – रावेत किवळे
सकाळी 10 ते दुपारी 1 – सेलेस्टीयल सिटी फेज एक
दुपारी 2 ते 5 – डी मार्ट जवळ, रावेत

4 डिसेंबर (शुक्रवार) – पर्वती, सहकारनगर, सिंहगड रोड
सकाळी 10 ते दुपारी 3 – पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ

5 डिसेंबर (शनिवार) – बाणेर, पाषाण
सकाळी 10 ते दुपारी 1 – गणराज चौक, बाणेर
दुपारी 2 ते 5 – साई चौक, पाषाण

6 डिसेंबर (रविवार) – वाकड
सकाळी 10 ते दुपारी 3 – सुफलम नर्सरी गेट, कस्पटे वस्ती

7 डिसेंबर (सोमवार) – पिंपरी-चिंचवड
सकाळी 10 ते दुपारी 1 – वाल्हेकरवाडी रोड, जकात नाका, चिंचवड
दुपारी 2 ते 5 – लिंकरोड, गावडे पेट्रोल पंपाजवळ

8 डिसेंबर (मंगळवार) – सांगवी
सकाळी 10 ते दुपारी 1 – पीडब्ल्यूडी मैदान, सांगवी
दुपारी 2 ते 5 – श्री शिवाजी विद्यामंदिर समोर, औंध

9 डिसेंबर (बुधवार) – कर्वेनगर, वारजे माळवाडी
सकाळी 10 ते दुपारी 3 – वनदेवी मंदिराजवळ, कर्वे रोड

10 डिसेंबर (गुरुवार) – थेरगाव, रहाटणी, काळेवाडी
सकाळी 10 ते दुपारी 3 – गणेश मंदिर, गणेश नगर, डांगे चौकाजवळ

11 डिसेंबर (शुक्रवार) – कात्रज, नऱ्हे, आंबेगाव
सकाळी 10 ते दुपारी 1 – कात्रज चौक
दुपारी 2 ते 5 – डी मार्टजवळ, आंबेगाव

12 डिसेंबर (शनिवार) – चिखली मोशी
सकाळी 10 ते दुपारी 1 – विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, राजे शिवाजीनगर, सेक्टर 16
दुपारी 2 ते 5 – जय गणेश साम्राज्य चौक, स्पाईन रोड

13 डिसेंबर (रविवार) – शुक्रवार पेठ
सकाळी 10 ते दुपारी 3 – नाईक हॉस्पिटल परिसर

14 डिसेंबर (सोमवार) – पिंपळे सौदागर
सकाळी 10 ते दुपारी 3 – कोकणे चौक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.