Pimpri News: कोरोना लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या : महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविताना स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

महापालिकेच्या फ प्रभागामध्ये स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, जलनि:सारण, वैद्यकीय आणि आरोग्य विषयक प्रश्नांबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी महापौर बोलत होत्या.

विधी समिती अध्यक्षा स्वीनल म्हेत्रे, क्रीडा कला साहित्य व सास्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसदस्य प्रविण भालेकर, नगरसदस्या सुमन पवळे, पौर्णिमा सोनवणे, संगिता ताम्हाणे, योगिता नागरगोजे, साधना मळेकर, कमल घोलप यांनी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध प्रश्नांबाबत समस्या महापौरांसमोर मांडल्या.

त्यामध्ये विद्युत विषयक कामे अर्धवट आहेत, रस्ते खोदाईमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, पाणीपुरवठा, ड्रेनेज कामे पूर्ण करावी, लसीकरणाचा तुटवडा आहे, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, वैद्यकीय स्टाफ वाढवावा, विविध ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे, आयुक्तांच्या बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन होत नाही. यमुनानगर येथील महाराणा प्रताप उद्यान ते एलआयसी भागातील रस्त्यांवर झाडे वाढलेली आहेत त्यांचा विस्तार कमी करणेत यावा. रुपीनगर, तळवडे, चिखली भागात स्वतंत्र टाकी बसवावी. बजेट वाढवावे, अधिका-यांमध्ये समन्वय नाही आदी समस्या सदस्यांनी मांडल्या.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, साथीच्या रोगासंदर्भात आयुक्त, वैद्यकीय आणि आरोग्य विभागास सूचना दिलेल्या आहेत. अधिका-यांनी नगरसदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करावे त्यांना कामाची अद्यावत माहिती द्यावी. पाण्याच्या समस्या सोडवाव्या, प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा. विद्युत विषयक अपूर्ण कामे त्वरीत करावी.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.