Pimpri News : पोलिसांच्या विविध ऑपरेशनस् चे चांगले परिणाम

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड  पोलिसांनी राबविलेल्या निरनिराळ्यी ऑपरेशन चे चांगले परिणाम दिसून आले. शनिवारी ( 21 जानेवारी) मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत ऑल आऊट( Pimpri News)ऑपरेशन, कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करून गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

यात पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह शस्त्रे आणि अंमली पदार्थही मिळून आले. तसेच नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर देखील पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखांमधील 66 पोलीस अधिकारी, 350 पोलीस सहभागी झाले.

Akurdi News : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजबाहेर एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

नाकाबंदी दरम्यान 1 हजार 796 वाहने तपासण्यात आली. रेकॉर्डवरील व हिस्ट्रीशिटर 411 आरोपी चेक केले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे 185 वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. 144 संशयीत इसमांना चेक केले.

अवघ्या पाच तासात 137 हॉटेल, लॉज तपासले. पाहिजे आरोपी 29 चेक केले. त्यापैकी 14 आरोपींना अटक केली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 22 जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरु ठेवणाऱ्या 21 हॉटेल चालकांवर खटले भरण्यात आले आहेत.

Pimpri Crime News : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

पोलिसांनी 21 तडीपार आरोपी चेक केले. मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे 13 कारवाया केल्या. आठ लोखंडी कोयते, दोन तलवार, दोन सुरे अशी 12 हत्यारे जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारुबंदी कायदयाप्रमाणे सात कारवाया (Pimpri News )करण्यात आल्या. अजामीनपात्र सात वॉरंट बजावण्यात आले.

सहा जणांना पकड वॉरन्ट देण्यात आले. संशयीत सहा वाहने ताब्यात घेण्यात आली. आठ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या. पाच फरारी, दोन मोक्का मधील आरोपींची तपासणी, एक तडीपार शहरात आढळून आल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. गांजा विक्री प्रकरणी एकास अटक करून त्याच्याकडून 8 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.