Pimpri News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लालबाबू गुप्ता यांचा समाजसेवा पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जंयतीनिमित्त भोजपुरी पंचायतीच्या वतीने विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांचा राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजसेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मुंबईत राजभवानत झालेल्या कार्यक्रमात गुप्ता यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्यासह गायक उदित नारायण, अभियान संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा, भोजपुरी पंचायतची संपादक कुलदीप श्रीवास्तव, प्रा. जयकांत सिंह यांच्यासह भोजपुरी साहित्य,सिनेमा, समाजसेवासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना लालबाबू गुप्ता म्हणाले, ”डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे जीवन चरित्र सर्वांनी अनुसरणे आवश्यक आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. यासाठी शक्य त्या परीने प्रत्येकाने समाजसेवा करत राहिले पाहिजे. भारतीय संस्कृतीने समाजकार्याचा संदेश दिला आहे. विश्व श्रीराम सेनेच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करतो. या पुरस्काराने समाजासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली. सर्वांनी पुढे येऊन समासाठी काम करावे. माणुसकी हिच विकासाचे मूल्य आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.