Pimpri News : राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा तातडीने पूर्ण करावी  – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल या पदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पदाची गरिमा राखण्याचं काम राज्यपालांनी  करणे गरजेचे असताना  राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी हे विविध कारणांनी वादात सापडले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अवमान केला. यावर महाराष्ट्र राज्यात अनेक मोर्चे,आंदोलने झाली मात्र, तरीसुद्धा पदमुक्ती झाली नाही. आता राज्यपालांची पदमुक्तीची  इच्छा  तातडीने पूर्ण करून त्यांना उत्तराखंडला पाठवावे, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते (Pimpri News) यांनी केली आहे.

याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात नखाते यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक राज्यपालांनी येथे येऊन त्यांच्या पदाला न्याय देण्याचे काम केले. मात्र भगतसिंह कोश्यारी  यांची नियुक्ती जेव्हापासून झाली तेव्हापासून ते नेहमीच वादात राहिलेले आहेत. राज्यपाल यांनी  महाविकास आघाडी काळात सरकारच्या कारभारात आवाजवी हस्तक्षेप केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांनीही आपल्याकडे केली होती. महापुरुषांच्या अवमानाबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार, व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

Balewadi News : रस्ता ओलांडत असताना अपघात, पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोना काळात मंदिरे बंद का ठेवता सेक्युलर झालात का ? अशाप्रकारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विचारले. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची महाविकास आघाडीची यादी ही त्यांनी मान्य केली नाही आणि नंतरच्या सरकारची दुसरी यादी त्वरित स्वीकारली. याला नायालायाने फटकारले आहे. वारंवार महापुरुषांचा अवमान केला. यामुळे सबंध महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलने झाली , मोर्चे झाले तरीही त्यांची बदली (Pimpri News) झालेली नाही, पद मुक्त करण्यात आले नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान म्हणून आपल्याकडे  पदमुक्त करण्याची मागणी केलेली आहे. त्यांची मागणी तातडीने मान्य करून त्यांना पदमुक्त करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.