Pimpri news: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गोविंद घोळवे यांनी केले अभिनंदन

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे नुतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे शिवसेनेचे राज्य संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी अभिष्टिंचतन केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून अधिक लोकाभिमुख कामे होण्यासाठी पटोले यांच्या नेतृत्वाचा अनुभव कामी येईल, असे घोळवे म्हणाले. दरम्यान, या भेटीत कुठलेही राजकारण नसल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

नाना पटोले भारतीय जनता पक्षात असल्यापासून ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे आणि त्यांच्या स्नेह आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण- डोंबवली येथे घोळवे आणि पटोले यांची भेट झाली. याप्रसंगी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल पटोले यांचे अभिनंदन केले. जुन्या आठवणींवर दोघांमध्ये चर्चा झाली.

नाना पटोले हे शेतक-यांचे नेते असून मुळचे विदर्भातील आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आणखी लोकाभिमुख करण्यासाठी त्यांचा अनुभव उपयोगी पडेल, असा आशावाद घोळवे यांनी व्यक्त केला.

सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राज्यात सत्तेत एकत्र असल्याने तीनही पक्षांमध्ये समन्वयाने काम चालू आहे. मात्र, आमच्या भेटीत कुठल्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे घोळवे यांनी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.