Pimpri News : साई चौकातील ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला

या ग्रेड सेपरेटरमुळे साई चौक येथील वाहतूक कोंडी कमी होवून हिंजवडी आयटी पार्क, पिंपळे सौदागर या व अन्य भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

एमपीसी न्यूज – साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन आज (गुरुवारी, दि. 27) महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पार पडले आहे.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, नगरसदस्या ममता गायकवाड, आरती चोंधे, शितल काटे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील साई चौक, जगताप डेअरी येथे हा ग्रेड सेपरेटर बनविण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन हा ग्रेड सेपरेटर बनविण्याचे नियोजन करण्यात आले होते.

नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरसाठी 28 कोटी 36 लाख इतका खर्च करण्यात आला आहे.

या ग्रेड सेपरेटरमुळे साई चौक येथील वाहतूक कोंडी कमी होवून हिंजवडी आयटी पार्क, पिंपळे सौदागर या व अन्य भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.