Pimpri News: मास्कविना फिरणा-या 961 जणांवर ‘ग्रीन मार्शल’ची कारवाई; साडेसहा लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाही अनेकजण मास्कचा वापर करत नाहीत. महापालिकेच्या ग्रीन मार्शल पथकाने 17 ते 23 जानेवारी या सात दिवसात मास्कविना फिरणा-या 961 जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून 6 लाख 50 हजार 140 रुपये दंड वसूल केला.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत आहे. 1 जानेवारी 2022 पासून शहरा कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंढ वाढ होत आहे. दिवसाची रुग्णसंख्या पाच हजाराच्या पुढे गेली. सक्रिय रुग्णांची आकाडाही 25 हजारांपर्यंत गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केला जात आहेत. कोरोनापासून काळजी घेण्यासाठी सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक केले असतानाही अनेकजण मास्कविना फिरतात.

मास्कविना फिरणा-यांवर कारवाईसाठी महापालिकेने ग्रीन मार्शल पथकाची स्थापना केली. या पथकाकडून शहरात मास्कविना फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. समज दिली जाते आणि मास्कही देण्यात येतो. 17 ते 23 जानेवारी दरम्यान मास्कविना फिरणा-या 961 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 6 लाख 50 हजार 140 रुपये दंड वसूल केला. तर, 4 हजार 211 जणांना समज देण्यात आली. 358 जणांना मास्कचे वाटप करण्यात आले. याबाबतची माहिती प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.