Pimpri News: ग्रीन्स गृहनिर्माण सोसायटी, आकुर्डी रुग्णालय अन् किज हॉटेल स्वच्छतेत प्रथम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्यात आल्या. स्वच्छ गृहनिर्माण संस्थेत थेरगावातील ग्रीन्स सोसायटी, स्वच्छ मंडईत पिंपरीतील फुल मार्केट मंडई, तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय, मोरवाडीतील किज हॉटेल आणि नवीन आकुर्डी रूग्णालयाने स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकाविला.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 शहरामध्ये सुरु झाले आहे. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा सर्व्हेक्षणाचा हेतू आहे. महापालिका क्षेत्रामधील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करणेत आले.

या अंतर्गत हॉस्पीटल्स, शाळा, हॉटेल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभुत सुविधा, स्वच्छता ऍप डाऊनलोड इ. निकषांचे आधारे गुणांक देण्यात आले आहे.

स्वच्छता स्पर्धेमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील संस्थांनी सहभाग घेतला. स्पर्धेकरिता अर्ज व इतर माहिती हॉटेल्स व रुग्णालया करीता वैद्यकीय विभाग, शाळाकरिता शिक्षण मंडळ, व गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले होते. यामध्ये प्राप्त झालेल्या शाळा, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये यांचे अहवालाचे गुणांकनानुसार गुणाक्रमांक काढण्यात आलेला असून त्याचा निकाल पुढीलप्रमाणे :-

स्वच्छ शाळा :- (माध्यमिक विभाग)
द गुड समॅरीटन स्कुल, काळा खडक, वाकड, ( “ड” क्षेत्रिय कार्यालय) – प्रथम क्रमांक
पिं.चि.मनपा शाळा क्र. 92, म्हेत्रेवस्ती, (“फ” क्षेत्रिय कार्यालय) – व्दितीय क्रमांक
बाबुराव घोलप कॉलेज, नवी सांगवी, (“ह” क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, (“अ” क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक

स्वच्छ गृहनिर्माण संस्था :-

ग्रीन्स सोसायटी, थेरगांव (ग क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक.
कल्पतरू इस्टेट फेज – 2, जवळकरनगर, पिंपळे गुरव (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
सुखवाणी कॅम्पस, वल्लभनगर (ह क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक

स्वच्छ मंडई :-
फुल मार्केट मंडई, पिंपरी – (ह क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
कावेरी भाजी मंडई, कावेरी नगर,वाकड – (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
अखिल चिंचवड मंडई, चाफेकर चौक, चिंचवड – (ब क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक

स्वच्छ शासकीय कार्यालय :-
तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय, यमुनानगर – (फ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
पोस्ट ऑफिस, पिंपळेगुरव गावठाण – (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
वाकड पोलीस स्टेशन, वाकड, थेरगांव – (ग क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक

स्वच्छ हॉटेल :-
किज हॉटेल, सेन्ट्रल मॉल शेजारी मोरवाडी, पिंपरी – (अ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
श्री शिवाई हॉटेल, एच ब्लॉक,मोरवाडी – (अ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
अभिशिनिया हॉटेल, वाकड – (ड क्षेत्रीय कार्यालय) – व्दितीय क्रमांक
अतिथी हॉटेल, थेरगांव – (ग क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
हॉटेल कलासागर, वल्लभनगर – (ह क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक

स्वच्छ हॉस्पिटल :-
नवीन आकुर्डी रूग्णालय, आकुर्डी – प्रथम क्रमांक
जिजामाता हॉस्पिटल, पिंपरी कॅम्प, पिंपरी – प्रथम क्रमांक
नवीन थेरगांव रूग्णालय, थेरगांव गावठाण, थेरगांव – प्रथम क्रमांक
नवीन भोसरी हॉस्पिटल, गुळवे वस्ती, भोसरी – प्रथम क्रमांक
ओएनपी लिला हॉस्पिटल, ७२ बीआरटी रोड – प्रथम क्रमांक
स्टर्लिंग हॉस्पिटल, प्राधिकरण निगडी – प्रथम क्रमांक
विनस हॉस्पिटल, जाधववाडी, चिखली – व्दितीय क्रमांक
वेदान्त मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, चिंचवड – तृतीय क्रमांक विजेत्यांस क्षेत्रीय कार्यालयातर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.