Pimpri News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात सामाजिक उपक्रम राबवत बाबासाहेबांना अभिवादन

एमपीसी न्यूज – सामाजिक उपक्रम राबवत शहरात ठिकठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी व कुणाल वाव्हळकर मित्र परिवाराच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शंभरहुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आरपीआयचे (ए) प्रदेश महासचिव बाळासाहेब भागवत, शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, युवकाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, नगरसेवक संदीप कस्पटे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, अल्पसंख्याकचे ख्वाजाभाई शेख यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

समता सैनिक दलाच्या वतीने देखील घरकुल नवनगर संकुल, चिखली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 21 जणांनी रक्तदान केले. देहूरोड येथील सीओडी डेपोतील प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल बी एस सागी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी ले . कर्नल बी. एस. सागी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल कामगारांना माहिती दिली.

आळंदी नगरपरिषद, विविध संस्था आणि संघटना यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड, लेखापरिक्षक विशाल बासरे, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, करसंकलन अधिकारी टीयु खरात, आरोग्य पर्यवेक्षिका शितल जाधव, स्वप्निल भोसले, मुकादम मालन पाटोळे व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.