Pimpri News: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस तसेच मोशी येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार(Pimpri News) अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य मारुती भापकर, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, सुप्रिया सोळांकुरे, शारदा मुंढे यांच्यासह महापालिकेचे (Pimpri News) कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

Alandi News : आळंदीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मोशी येथील महापालिकेच्या शाळेमधील झालेल्या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, मुख्याध्यापिका छाया शिंदे तसेच शिक्षक माया लोखंडे, संगिता सस्ते, राजेंद्र पानसरे, उमेश सूर्यवंशी, संतोष शितोळे, सागर नेटके यांच्यासह (Pimpri News) विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) वतीने आयोजित करण्यात आलेले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.