Pimpri News : 25 ते 30 हजार रूपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज – 25 ते 30 हजार रूपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाला यश आले आहे. आरोपींकडून 2 लाख 97 हजार 800 रूपयांच्या बनावट नोटा तसेच, 50 हजार रूपयांचे नकली नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे.

गणेश दादु जाधव, कफील नसीम शेख (वय 31, रा, औरंगाबाद), हडमत बाबुसिंग राजपुरोहीत (वय 31, रा. बारामती, मुळगाव – राजस्थान), श्रीकांत सदाशिव माने (वय 32, रा. बारामती) आणि गणेश सुधाकर मुळे (वय 32, रा. पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मागील दोन ते तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापत होते. 25 ते 30 हजार रूपयांच्या बदल्यात एक लाख रूपयांच्या बनावट नोटा ते तयार करून देत असत. दरोडा विरोधी पथकाला वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपींना ताब्यात घेत 14 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेऊन सखोल तपासाअंती टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून 2 लाख 97 हजार 800 रूपयांच्या बनावट नोटा तसेच, 50 हजार रूपयांचे नकली नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.