Pimpri News : शहरात गुरुनानक जयंती साधेपणाने साजरी

एमपीसी न्यूज – शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू गुरुनानक देव यांची 551वी जयंती आज देशभरात साजरी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरुनानक जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. काही ठिकाणी लंगरसह सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

शीख बांधव दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरुनानक जयंती साजरी करतात. यावर्षीच्या गुरुनानक जयंतीवर कोरोनाचे सावट असल्यामुळे शहरातील विविध गुरुद्वारामध्ये साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. पिंपरीतील श्री गुरुनानक दरबार गुरुद्वारात लंगरचे आयोजन करण्यात आले होते तसेच, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास पन्नास नागरिकांनी रक्तदान केल्याची माहिती मनजित सिंग यांनी दिली.

आकुर्डीतील श्री वाहेगुरु गुरू नानक मानसरोवर गुरुद्वारात कोरोनाचे सर्व नियम पाळत गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली. याठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. भाविकांची सुरक्षा लक्षात घेता लंगरचे नियोजन रद्द करण्यात आले होते. असे मनजित खालसा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.