Pimpri News: ‘तो एकटा निघाला’…! खासदार कोल्हे यांनी लिहिली शरद पवार यांच्यावर कविता

एमपीसी न्यूज – जागतिक मराठी भाषा दिना निमित्त शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ‘तो एकटा निघाला’ ही कविता लिहिली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार या झंझावातास प्रणाम केला आहे. साहेबांना वंदन करत असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. ही कविता डॉ. कोल्हे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता…

”पुरोगामी महाराष्ट्रातूनी फुंकार एक उमटला, पुरोगामी महाराष्ट्रातूनी फुंकार एक उमटला, तुडवित रान, उधळित प्राण तो एकटा निघाला…काट्यांनी रक्ताळले पाय जरी, काट्यांनी रक्ताळले पाय जरी…अगळीत घाव ते उरावरी…ओडखडा परी काळजावरी कधी न उमटू दिला, तो एकटा निघाला…

”बदनामीचे पचवून प्याले, बदनामीचे पचवून प्याले, विरोधाचे झेलून भाले…जिद्द पेरुनी पावलात, ना थांबला, ना संपला, तो एकटा निघाला…बळीराजाची घेता साद, बळीराजाची घेता साद, कर्जमाफीचा क्षणी प्रतिसाद, स्वयंपूर्णता अन्न, धान्यात, देश उन्नतीचा मार्ग रेकीला..तो एकटा निघाला…

”कला, क्रीडा, साहित्यप्रेमी, कला, क्रीडा, साहित्यप्रेमी, विश्व प्रगतीचे भान नेहमी…तळहाताच्या रेषांपरी तयाने हा महाराष्ट्र जाणला…तो एकटा निघाला…विज्ञानाची धरुनी कास, विज्ञानाची धरुनी कास, केला सत्त शास्वत विकास, यशवंतरावांचा पट्ट शिष्य हा सच्या वारस शोभला…तो एकटा निघाला….

”अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, अचूक आपत्ती व्यवस्थापन, मूर्त केले महिला धोरण…दूरदृष्टीच्या निर्णयांचा…तो धोरण कर्ता झाला…तो एकटा निघाला..

उमर असे ती ऐंशीची…उमर असे ती ऐंशीची…54 संसदीय जीवनाची, राजकारणी देशाच्या ठसा मराठी उमटविला…तो एकटा निघाला…शिव प्रभुंचा हाच वारसा, शिव प्रभुंचा हाच वारसा, फुले, शाहु, आंबेडकरी वसा..जगता, लढता जिवंतपणी तो अभ्यासाच ग्रंथच झाला…तो एकटा निघाला…

तत्वासाठी सदैव नडला…तत्वासाठी सदैव नडला…दडपशाहीला निर्भिड भिडला…तरुणाईच्या मनावरही संघर्ष योद्ध्या म्हणूनही जडला…तो एकटा निघाला….जरी एकटा निघाला…जरी एकटा निघाला…तरी गारुड जनामनाला, जनसागर उसळत गेला…विकास गाण घुमवित छान…त्याने महाराष्ट्र घडवला…तुडवित रान, उधळित प्राण…त्याने महाराष्ट्र घडविला…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.