_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: आरोग्य शिबिरामुळे आरोग्य अबाधित राहण्यास मदत – महापौर ढोरे

कोरोना, नेत्र तपासणीने समाजप्रबोधन पर्वाला प्रारंभ

एमपीसी न्यूज – स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे अनेक स्त्रिया विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तथापि, कर्तव्य बजावताना महिलांचे आपल्या तब्येतीकडे थोड्याफार प्रमाणात दुर्लक्ष होते. त्यामुळे आज आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राहण्यास निश्चित मदत होईल, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले. त्याचा प्रारंभ रक्तदान, कोरोना रॅपिड तपासणी, नेत्र तपासणी, शारीरिक तपासणी शिबिराने झाला. त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, वैशाली काळभोर, प्रियंका बारसे, आश्विनी जाधव, नम्रता लोंढे, रेखा दर्शिले, माजी नगरसदस्य वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, भाई विशाल जाधव, देवेंद्र तायडे, ॲड. चंद्रशेखर भुजबळ, योगेश लोंढे, गणेश वाळुंजकर, युसूफ कुरेशी, युवराज दाखले, संतोष जोगदंड, शंकर लोंढे, पी. के. महाजन, हनुमंत माळी, गिरिष महुले, गिरीष वाघमारे, प्रताप गुरव, विजयराव दर्शिले, हाजी रसुल, प्रसाल कुदळे, नसीर शेख, संतोष शिंदे, मारुती काटके, राम जाधव, विशाल शिंदे, मारुती कदम, तेजस्विनी कदम, वैशाली राऊत, सुषमा सोनवणे, ॲड. विद्या शिंदे, वंदना जाधव, सुप्रिया जाधव, रोहिणी रासकर, मिरा कुदळे, अनिता ताटे आदी उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “महिला शिक्षक दिन” म्हणून राज्यात सर्वत्र साजरी करण्याबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतलेला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावित्रीबाई फुले महिला व्यासपीठ, ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी संघर्ष सेना, महाराष्ट्र परिट सेवा मंडळ, पिंपरी चिंचवड शहर लॉंड्री संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नागरी हक्क सुरक्षा समिती, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी कार्यक्रम यशस्विततेसाठी प्रयत्न केले.

सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.