Pimpri news: आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी मागविली पालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या कुटूंबियांच्या ‘व्यावसायाची’ माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व  कर्मचारी यांच्या कुटुंबातील (प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसहित) व्यापार किंवा धंदा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती अशा अधिकारी, कर्मचा-यामार्फत  पालिकेस कळविण्यात आलेली आहे. त्या सर्व कागदपत्रांचा तपशील व त्यासंबंधीची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी माहिती अधिकारात मागविली आहे.

शासकीय कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यापार, व्यवसाय करत असल्यास ते कळवणे आवश्यक आहे. पालिकेतील काही अधिकाऱ्यांची मुले बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर आहेत. अनेकांच्या मुलांचे पालिकेत लागेबांधे आहेत. साटेलोटे आहे. काही अधिकारी तर कंत्राटे घेत आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी मुलांच्या, पत्नीच्या व्यवसायाची माहिती पालिकेला कळवलेली नाही. रॉय यांनी मुलाच्या आणि कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर यांनी पत्नीच्या व्यवसायाबाबत पालिकेला माहीती कळविली नसल्याचा शेरा आयुक्तांनी मारला आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. रॉय यांनी आता माहिती अधिकारांतर्गत सर्वच अधिकाऱ्यांची माहिती मागविली आहे. जन माहिती अधिकारी तथा प्रशासन अधिकारी प्रशासन विभाग यांना माहिती अधिकारांतर्गत पत्र पाठविले आहे. पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व  कर्मचारी यांच्या कुटुंबातील (प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसहित) व्यापार किंवा धंदा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती अशा अधिकारी, कर्मचा-यामार्फत  पालिकेस कळविण्यात आलेली आहे. त्या सर्व कागदपत्रांचा तपशील व त्यासंबंधी नस्तीतील कागदपत्रे मिळावीत. महापालिका, आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतची 1 जानेवारी 2015 ते आजपर्यंतची माहिती मागविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.