Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार, अवघ्या दहा मिनिटांत रस्ते जलमय

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. अवघ्या दहा मिनिटांत रस्ते जलमय झाले तर ठिक ठिकाणी पाणी साचले.

शहरातील सखल भागात साचलेले पाणी व जोरदार पावसामुळे वाहन चालकांना वाहन चालविण्यास कसरत करावी लागली.

_MPC_DIR_MPU_II

शहरात दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे आज दुपारपासून उकाडा जाणवत होता. चाकण परिसरात दुपारनंतर पावसाने चांगली हजेरी लावली.

त्यानंतर सव्वा सहाच्या सुमारास पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. अवघ्या दहा मिनिटात रस्ते जलमय झाले.

उकाड्यामुळे त्रस्त झालेले नागरिक जोरदार पावसामुळे काहीसे सुखावले. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला हलकी संततधार सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.