Pimpri News : शहरात पावसाची जोरदार हजेरी, वातावरणात गारवा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली. जोराच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

_MPC_DIR_MPU_II

मागील दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. आज बुधवारीही दुपारी कडक
ऊन होते. दरम्यान, सायंकाळी साडेचार नंतर वातावरण अचानक बदलले आणि सोसाट्याच्या वा-यासह ढग दाटून येऊ लागले. पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक बरसलेल्या या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली.

सायंकाळच्या वेळी कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांचेही हाल झाले. अनेकांनी सोबत रेनकोट, छत्री नसल्याने पुलाखाली अथवा झाडाखाली अडोसा घेतला. तर काहींनी पावसात भिजत जाण्यास प्राधान्य दिले. रस्त्यावरील धूळ, त्यातच पाऊस पडल्याने काही ठिकाणचे रस्ते निसरडे झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.