Pimpri News : प्रतिभा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात 

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘हिंदी दिवस‘ उत्साहात साजरा करण्यात आला. गुगट मीटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ‘हिंदी दिवस’ निमित्त बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना हिंदी कविता वाचन, साहित्यिकांचा परिचय, भाषण, गायन अशा विविध कलाकृती सादर केल्या.

कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक सुशील भोंगे यांनी केले. तसेच, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड्. विद्यार्थ्यांनी सुरेखा आवटे यांनी केले. आभारप्रदर्शन बी.एड्. विद्यार्थीनी वर्षा धावडे हिने केले. महाविद्यालयातील सर्व सहकारी व बी.एड्. द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थिती लावली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.