Pimpri News : लायन्स क्लब निगडी वतीने  एसटी वल्लभनगर आगारा मध्ये हिरकणी कक्ष : लायन्स क्लब निगडी वतीने  एसटी वल्लभनगर आगारा मध्ये हिरकणी कक्ष

एमपीसी न्यूज-  लायन्स क्लब ऑफ पूना निगडी (Pimpri News) यांचे वतीने एसटी वल्लभनगर आगारा मध्ये सर्व सुविधा युक्त हिरकणी कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्याचे नुकतेच  उद्घाटन लायन्स चे प्रांतपाल राजेश कोठावदे यांचे हस्ते करण्यात आले.

 

 

Chakan News : चाकण मध्ये कांद्याची उच्चांकी आवक

 

 

याप्रसंगी लायन्स निगडी क्लब चे अध्यक्ष देविदास ढमे,  एसटी पिंपरी चिंचवड आगाराचे व्यवस्थापक,सौ स्वाती बांद्रे, लायन्स चे विभागीय अध्यक्ष डॉ.दिलीप सिंह मोहिते, उपविभागीय अध्यक्ष- सलीम शिकलगार, समवेत हिरकणी कक्ष प्रकल्प प्रमुख – राजीव कुटे व संजय निंबाळकर तसेच एसटी चे  पदाधिकारी व कर्मचारी व लायन्स पदाधिकारी उपस्थित होते.

 

आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी स्वागतपर भाषणात प्रवासी माता भगिनी- बालके यांच्या सुविधांसाठी हिरकणी कक्षाचे महत्व सांगितले, व लायन्स चे सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. लायन्स चे प्रांतपाल, राजेश कोठावदे यांनी एसटी  प्रशासन व नागरी सुविधा लोकाभिमुख प्रकल्प याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन  प्रतिभा सुरळवाडकर तसेच आभार स्वाती बांद्रे यांनी मानले. याप्रसंगी लायन्स निगडी चे अध्यक्ष देविदास ढमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व एसटी प्रशासन चे आभार व्यक्त केले. कार्यक्रम संयोजनात (Pimpri News) जयश्री मांडे व स्मिता कुटे यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.