Pimpri News: ‘एड्‌स’बाधित रुग्णांचे हाल, औषधांसाठी ‘वायसीएमएच’मध्ये थांबावे लागते ताटकळत : उमेश सणस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील ‘एचआयव्ही’ आणि ‘एड्‌स’बाधित रुग्णांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ‘एआरटी’ केंद्रातून औषधे मिळविण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. तासन तास लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जागृत नागरिक महासंघाचे सचिव उमेश सणस यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सणस यांनी म्हटले आहे की, ‘एचआयव्ही’ची औषधे पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मिळतात. त्यासाठीचे ‘एआरटी’ केंद्र वायसीएम रुग्णालयात आहे. पण, मागील काही दिवसांपासून औषधे मिळण्यासाठी नागरिकांना अडथळे येत आहेत. ताटकळत थांबावे लागत आहे. डॉक्टरांची कमतरता आहे. रुग्ण वाऱ्यावर आहेत. वायरल लोडसाठी गर्दी होते. परंतु, दररोज फक्त 50 पेशन्टची तपासणी केली जाते आणि तीही फक्त मंगळावर आणि शुक्रवारीच होते.

तपासणीसाठी 100 ते 150 रुग्ण रांगेत थांबलेले असतात. काही दिवसांपूर्वी रांगेत उभे असताना एका रुग्णाच्या अंगावर झाडाची फांदी पडून रुग्ण जखमी झाला होता. नोडल ऑफिसर डॉ. नितीन मोकाशी यांचे रुग्णांकडे साफ दुर्लक्ष आहे. औषधांचा तुटवडा आहे. कोरोना नियमावलीला केराची टोपली दाखविली जाते. सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालेला असतो. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती सणस यांनी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.