Pimpri News : बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पालिकेकडून अभिवादन

एमपीसी न्यूज – बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये हा कार्यक्रम झाला.

यावेळी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक नगररचना उपसंचालक प्रशांत शिंपी, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पत्रकार नाना कांबळे, बापूसाहेब गोरे, सूरज साळवे, दिलीप देहाडे, कलींदर शेख, अनिल भालेराव, प्रीतम शहा, संतोष जराड, गणेश शिंदे, दिपक श्रीवास्तव, गणेश मोरे, देवा भालके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, “‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राची सुरुवात करून लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील दिलेले योगदान आधुनिक पत्रकारितेला सतत मार्गदर्शक ठरत आहे.

दर्पण या मराठी भाषेतील वृत्तपत्राद्वारे पत्रकारितेची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. ते इंग्रजी राजवटीतील अनेक विषयांचे अभ्यासक, संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक आणि पत्रकार होते. जनतेला माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी बाळशास्त्रींनी केलेली पत्रकारिता आणि मराठी पत्रकारितेला दिलेला निर्भिड, नि:ष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा महत्वपूर्ण आहे, असे महापौर ढोरे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.