Pimpri News : गृहमंत्री देशमुख यांना काळे झेंडे दाखवून करणार निषेध : संभाजी ब्रिगेडचा इशारा

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. याप्रकरणी संभाजी ब्रिगेड चांगलीच आक्रामक झाली आहे. त्यामुळे 26 जानेवारीला पुणे दौऱ्यावर असणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना देऊ, असे आश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले होते.

मात्र, याबाबत अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे 26 जानेवारीला पुणे दौऱ्यावर असणाऱ्या गृहमंत्री देशमुख यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत असल्याचे   देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. देशमुख यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त व प्रशासनाला योग्य सुचना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे काळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.