Pimpri News : हॉटेल व्यावसायिक म्हणतात, नवे निर्बंध म्हणजे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

एमपीसी न्यूज – पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार बारा तासांचा नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला असून, सात दिवसांसाठी हॉटेल, बस, धार्मिक स्थळे, मॉल बंद राहणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी या निर्णयाला विरोध करत नवे निर्बंध म्हणजे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असल्याचे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. शनिवारपासून पुण्यात बारा तासांचा नाईट कर्फ्यु असणार आहे. पुढचे सात दिवस हॉटेल, बस, धार्मिक स्थळे, मॉल बंद राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी म्हणाले, ‘हॉटेल व्यावसायिकांसाठी हा काळा दिवस आहे. प्रत्येक वेळी हॉटेल व्यावसायिकच निशाण्यावर असतात. अगोदरच हे व्यावसायिक आर्थिक संकटाशी सामना करत आहेत.

एका वर्षात तब्बल 40 टक्के हॉटेल व्यावसायिकांचा व्यावसाय बुडला. आता कुठं स्थिरस्थावर होत असताना पुन्हा एकदा बंदी घातली आहे. संकट मोठं आहे मान्य पण, लॉकडाऊन हा पर्याय आहे का, याचा विचार व्हायला हवा. आणि फक्त हॉटेल व्यावसायिकांनाच निशाण्यावर का धरलं जातंय, बाकी आस्थापना सुरुच आहेत’.

लोणावळा येथील अन्नपूर्णा हॉटेलचे मॅनेजर संतोष सरदेशमुख म्हणाले, एका वर्षानंतर जेव्हा हॉटेल व्यावसायिक स्थिरस्थावर होत असताना पुन्हा बंदी न परवडणारी आहे. इतर गोष्टी सुरू आहेत मात्र हॉटेलवर प्रत्येकवेळी निर्बंध घातले जातात त्यामुळे हॉटेल व्यावसायिक विवंचनेत आहेत’

दरम्यान, शनिवारपासून सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. मात्र पार्सल सेवा सुरु राह

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.