Pimpri News : ‘एचआर’ कंपनी व्यवस्थापन आणि कामगार या मधील दुवा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : कंपनी व्यवस्था आणि कामगार यांच्यामध्ये (Pimpri News) दुवा साधण्याचे काम ‘एचआर’ करतो आणि त्यामुळेच ‘एचआर’ला कंपनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे असे मत राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पुणे बिझनेस स्कूलच्या (पीबीएस) वतीने ‘एचआर एक्सलन्स 2022 ॲवॉर्ड’चे वितरण मंत्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी पीसीसीओईचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, विकफिल्डचे कार्यकारी संचालक मुकेश मल्होत्रा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. पराग काळकर आदी उपस्थित होते.  

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. त्यासाठी औद्योगिक क्षेत्राचा विकास त्याचबरोबर संशोधन, पेटंट अशा विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे काम सुरू आहे. तसेच मनुष्यबळ विकास धोरण ठरविण्यासाठी यादव यांचे प्रयत्न सुरू असून त्याबाबत अनेक राज्यांशी चर्चा, बैठका होत आहेत. महाराष्ट्रातही आतापर्यंत अनेक तज्ज्ञांबरोबर बैठका झाल्या. लवकरच औद्योगिक क्षेत्र, मनुष्यबळ विकास यावर राष्ट्रीय धोरण निश्चित करून अंमलबजावणी केली जाईल. यासाठी एचआर तज्ज्ञांनी आपल्या सूचना, अडचणी, उपाय योजना याची माहिती राज्य सरकारच्या उच्च तंत्रज्ञान विभागाकडे पोहोचवावी असे आवाहन पाटील यांनी केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पीसीईटी ही संस्था माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केली. त्यांना ज्ञानेश्वर लांडगे, शांताराम गराडे, विठ्ठल काळभोर, कै. भाईजान काझी, डॉ. गिरीश देसाई आदींची साथ मिळाली. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संस्थेचा हळूहळू विस्तार होत गेला. संस्थेस राज्य सरकारने नुकताच स्वयं अर्थसहाय्य अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.

Pune News : आईच्या निधनाचे दुःख विसरण्यासाठी लहानथोरांसह तापकीर कुटुंबियांची वृद्धाश्रमात सेवा…

केजी टू पीजी शिक्षण येथे उपलब्ध आहे. अनेक (Pimpri News) आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर संस्थेने सामंजस्य करार केले आहेत. येथे संशोधनास विशेष चालना दिली जाते. त्यातूनच पेटंट नोंदणीचा राष्ट्रीय उच्चांक संस्थेने प्राप्त केला आहे. संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार, आधुनिक काळानुरूप उच्च शिक्षण देण्याचे कार्य केले जाते. पीबीएसच्या वतीने ‘एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड’ चा असा कार्यक्रम पुढे दर वर्षी करण्याचे नियोजन आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या परिक्षण मंडळात सुधीर मतेती, निरज गुप्ता, संग्रामसिंह पवार, डॉ. गीतिका मदन, विनोद बिडवाईक, सौरभ शहा, वैभव देशमुख, डॉ. गिरीश देसाई यांचा समावेश होता.

मिलिंद मुतालिक, एस. के. दत्त, शांतनू घोषाल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिव्यांग आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कविता देसले, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ राजेश पिल्ले, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी ऋषिकेश आढाव यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विविध श्रेणीमध्ये पारितोषिके ‘यंग एचआर टॅलेंट’ ‘टॅलेंट ऍक्विझिशन’ ‘एचआर ऑपरेशन्स’मध्ये नावीन्यपूर्ण शिकणे आणि विकास, गुणवत्ता व्यवस्थापन, कर्मचारी संबंध, उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार, ‘सीएचआरओ ऑफ द इयर’ या श्रेणीत पारितोषिके देण्यात आली.

प्रास्ताविक डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी केले. एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड’ स्पर्धेसाठी देशभरातून पाचशे प्रवेशिका आल्या. परिक्षकांनी पन्नास जणांची निवड पुरस्कारासाठी केली असे डॉ. त्यागी यांनी सांगितले. यावेळी परिक्षक, पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन डॉ. मिनाक्षी त्यागी, आभार डॉ. मंजू पुनीया चोप्रा यांनी मानले.

जॉबिझ्झा मल्टिपल सर्व्हिसेसचे गौरव शर्मा, डॉ. मिनाक्षी त्यागी, डॉ. मंजू चोप्रा, डॉ. गणेश राव, यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. पुरस्कार सोहळ्यास विविध कंपन्यांचे एचआर प्रतिनिधी, पीसीईटी शैक्षणिक संकुलाच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, शाखाप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.