Pimpri news : ग्रामीण भारत बदलला तर विकासाचा वेग वाढेल – प्रदीप लोखंडे

एमपीसी न्यूज-एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भारत बदलला तर विकासाचा वेग (Pimpri news)वाढेल. देशाच्या विकासात आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात शिक्षकांच्या कार्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. स्वतःचा शोध घेणे म्हणजे शिक्षण, असे मत रुरल रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले.
इंजीनियरिंग क्लस्टर चिंचवड पुणे, ऑटोमेटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल, एमएसएसडीसी, जर्मन कोऑपरेश, स्किल इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने इंजीनियरिंग क्लस्टर चिंचवड येथे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (Training of Traners) कार्यक्रमांतर्गत सीएनसी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन, ऍडव्हान्स वेल्डिंग, क्वालिटी इन्स्पेक्टर या विषयांचे शंभर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.
 त्यांचा दीक्षांत समारोह  आणि नवीन बॅचचा शुभारंभ शनिवारी (दि.21) करण्यात आला. यावेळी लोखंडे बोलत होते. यावेळी ऑटोमॅटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे सीईओ अरिंदम लाहिरी, आयजीव्हीटी प्रोजेक्ट हेड डॉ. रॉडनी रिव्हाइरे, जर्मन कोऑपरेशनच्या जेनिफर इसाबेल, इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक सागर शिंदे , आदी उपस्थित होते.

अरिंदम लाहिरी म्हणाले की, ‘स्किल इंडिया’ एक मिशन म्हणून काम करत आहे. औद्योगिक क्षेत्राला उभारी दिली पाहिजे असे शासनाचे धोरण आहे,. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राच्या गरजा विचारात घेऊन कार्यक्रम, योजना आखल्या जात आहेत. भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये (Pimpri news)अनेक आव्हाने आहेत. परंतु प्रशिक्षणाद्वारे याला बळ देण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात भारत जगाला कुशल मनुष्यबळ पुरवू शकतो अशी क्षमता आहे. त्या दृष्टीने औद्योगिक धोरण अवलंबले जात आहे, असे लाहेरी यांनी सांगितले.
डॉ. रॉडनी रिव्हाइरे म्हणाले, प्रशिक्षणार्थींना शिकवणे हे मोठे जबाबदारीचे काम असते. प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थीला उत्तम प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे. कारण प्रशिक्षणार्थीचे भविष्य या ज्ञानावर अवलंबून असते.
यावेळी विविध विषयांचे मुख्य प्रशिक्षक रामकृष्ण बो-हाडे, विजय गोर्डे, संजीव पिसे, बी. एन. देशपांडे, सतीश केसकर तसेच प्रशिक्षण कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या औद्योगिक संस्था, कंपन्या, त्यांचे प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
डॉ. के. ही. व्होरा यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरफान आवटे आणि मिनू सारावगी केले. आभार सागर शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी(Pimpri news) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.