Pimpri News : ‘मोदी है तो महंगाई है’; घरगुती गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – “मोदी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, माणुसकी गेली संपावर, ‘अच्छे दिन जाऊन पाहा पेट्रोल पंपावर’, ‘मोदी है तो महंगाई है”, “पेट्रोल डिझेलची सेन्चुरी झाली, मोदींना घरी पाठवण्याची वेळ आली” अशा जोरदार घोषणा देत घरघुती गॅस दरवाढीसह महागाई विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शनिवारी) आंदोलन केले. केंद्रातील मोदी सरकारने जनतेवर बेसुमार महागाई लादल्याच्या आरोप राष्ट्रवादीने केला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी महिलांनी चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध केला.

माजी महापौर योगेश बहल, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, मुख्य संघटक अरुण बो-हाडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे, गीता मंचरकर, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर, महम्मद पानसरे, राजेंद्र जगताप, शमीम पठाण, हरेष आसवानी, शाम वाल्हेकर, प्रसाद शेट्टी, तानाजी खाडे, अतुल शितोळे, घनश्याम खेडेकर, भाऊसाहेब सुपे, दत्तोबा लांडगे, शाम जगताप, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विशाल काळभोर, संदीप चिंचवडे, माधव पाटील, वर्षा जगताप, विजय लोखंडे, कविता खराडे, पुष्पा शेळके, सारिका पवार, मनीषा गटकळ, माऊली सुर्यवंशी, योगेश मोरे, गोरक्ष पाषाणकर, युसूफ कुरेशी, गंगा धेडे, पल्लवी पांढरे, संतोष वाघेरे, संजय औसरमल, रशीद सय्यद, बाळासाहेब पिल्लेवार, तानाजी जवळकर, कुशाग्र कदम, अमर अदियाल, निखिल दळवी, महेश झपके, आशा शिंदे, सचिन काळे, संदीप झोंबाडे, विजय कापसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संजोग वाघेरे म्हणाले, ”घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि महागाईच्या आगीत सामान्य जनतेला होरपळून टाकण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने चालवलेले आहे. गॅस सिलेंडरच्या दरात रोज वाढत आहेत. मागील दीड महिन्यात 150 रुपयांनी गॅस महागला आहे.

धनदांडग्यांचे, भांडवलदारांच्या भलं आणि गोर गरिबांवर अन्याय करणार केंद्र सरकार आहे. येणा-या काळात सामान्य जनता या केंद्र सरकारला धडा शिकवणार आहे. पेट्रोलने कधीच शंभरी पार केली आहे. 50 रुपये लिटर पेट्रोल देण्या वादा करत अच्छे दिन आणणा-या सरकारने इतके बुरे दिन आज आणले आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.