Pimpri News: ‘इंग्लंडवरुन 25 नोव्हेंबरनंतर शहरात आल्यास महापालिका रुग्णालयात संपर्क साधा’

महापालिका वैद्यकीय विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज – इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. जे कोणी 25 नोव्हेंबर 2020 नंतर इंग्लंडवरुन पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले असतील त्यांनी स्वत:हून व त्यांच्या सोसायटीचे अध्यक्ष यांनी आपल्या नजीकच्या महापालिका रुग्णालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन महापलिका वैद्यकीय विभागाने केले आहे.

इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू ‘स्ट्रेन’ आढळला आहे. या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात 25 नोव्हेंबर 2020 ते 23 डिसेंबर 2020 या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

25 नोव्हेंबर 2020 नंतर इंग्लंडवरुन पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आलेल्या नागरिकांनी स्वत:हून व त्यांच्या सोसायटीच्या चेअरमन/अध्यक्ष यांनी आपल्या नजीकच्या महापालिका रुग्णालयामध्ये संपर्क साधावा. तसेच महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक 8888006666 वर संपर्क करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

इंग्लंडवरुन आलेल्यांची माहिती देण्यासाठी यांच्याशी साधा संपर्क !

आकुर्डी रुग्णालय डॉ. सुनिता साळवे 9981161255, यमुनानगर रुग्णालय डॉ. प्रकाश ताडे 9922501326, भोसरी रुग्णालय डॉ. शैलेजा भावसार 9922501325, वायसीएम रुग्णालय डॉ. तृप्ती सागळे 8888844208, सांगवी रुग्णालय डॉ.विजया आंबेडकर 9922501353, जिजामाता रुग्णालय डॉ. संगिता तिरुमणी 9922501301, तालेरा रुग्णालय डॉ. सुनिल जॉन 9922501331 आणि थेरगाव रुग्णालय डॉ. सुनिता इंजिनिअर 9922501340 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.