Pimpri News: गणपतीचे विसर्जन घरीच करा; मूर्ती संकलनासाठी 40 रथ, 128 केंद्र

एमपीसी न्यूज – घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन नागरिकांनी शक्यतो घरी करावे. गणेश विसर्जनासाठी फुलांनी सजवलेले 5 सुशोभिकरण रथ असे एकूण 40 रथ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

प्रत्येक वॉर्डमध्ये 4 मूर्ती संकलन केंद्र असे एकूण 128 मूर्ती  संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत. तसेच त्या मूर्ती  विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी 40 वाहने महापालिका उपलब्ध आहेत.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शुक्रवारी घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आहे. महापालिकेने मूर्ती संकलनासाठी व्यवस्था केली आहे.  गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन मंडपालगत (कृत्रिम हौदामध्ये करण्यास प्राधान्य द्यावे. विसर्जनाकरिता मिरवणुकांवर बंदी असेल.

गणेश विसर्जन दिवशी (दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व दहा दिवस ) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामार्फत संकलनाकरिता फुलांनी सजवलेले 5 सुशोभिकरण रथ असे एकूण 40 रथ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये 4 मूर्ती संकलन केंद्र असे एकूण 128 मूर्ती  संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत तसेच त्या मूर्ती  विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी 40 वाहने उपलब्ध असणार आहेत. श्रींच्या विसर्जनाकरीता प्रत्येकी 2 कन्वेअर बेल्ट एका विसर्जन ठिकाणी असे 4 ठिकाणांवर एकूण 8 कन्वेअर बेल्ट उपलब्ध असतील.

विसर्जनाच्या दिवशी गर्दी न करता कमीतकमी लोक हजर राहतील याची दक्षता घ्यावी. प्रत्येक प्रभागातील सुशोभित रथाच्या मूर्ती संकलनासाठी (Route Chart ) मार्ग क्रमणिका प्रसिध्द करण्यात येणार असून त्यानुसार नागरिकांनी व मंडळांनी गणेशमूर्ती दान कराव्यात.

तसेच निर्माल्य स्विकारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनात निर्माल्य द्यावे. महानगरपालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तीचे विधीवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल. पीओपी (POP) च्या गणेशमूर्तीच्या विसंजनास बंदी असल्याने त्या स्विकारल्या जाणार नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.